Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 26, 2021
in आरोग्य
0
राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

नंदुरबार| प्रतिनिधी
नवापूर प्रकल्पातील धनराट १ व २ बीट अंतर्गत राणीकुंड येथे राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमातील नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे धनराट १ व २ बिट अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका यांनी भरवलेला पोषण बाजारामध्ये नाविन्यपूर्ण दहा स्टॉल लावण्यात आलेे होते.


नवापूर प्रकल्पातील धनराट १ व २ बीट अंतर्गत राणीकुंड येथे राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला. यावेळी  अंगणवाडी सेविका यांनी  पोषण बाजार भरविला. प्रत्येक  स्टॉल हा नाविन्यपूर्ण असा होता.यात परसबाग , वैयक्तिक व परिसर स्वच्छता,गरोदर व स्तनदा मातांचा आहार,बी.एम.आय,रक्तक्षय,पूर्व शालेय शिक्षण, सात अन्नगट, वृद्धी सनियंत्रण, लसिकरण विविध पौष्टिक पाककृती असे आहार प्रदर्शनाचे दहा स्टॉल यात समाविष्ट करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन व मार्गदर्शनानंतर सर्व किशोरवयीन मुले- मुली यांच्यासाठी पोषण बाजार खुला करण्यात आला. प्रत्येक स्टॉलला जाऊन सर्व किशोरवयीन मुले- मुली व  गरोदर – स्तनदा मातांनी माहिती जाणून घेतली. या सुंदर उपक्रमांचे कौतुक करीत अंजली वसावे यांनी प्रत्येक स्टॉलला दोनशे रुपये बक्षीस म्हणून दिलेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंशिता गावित यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती ललिता वसावे, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री्. हसिम, पर्यवेक्षिका शांताबाई कोकणी, सीमा मुळतकर, तसेच पिरामल फाऊंडेशनचे स्टीफन मस्कनळी, तालुका समन्वयक संदीप सुर्यवंशी, आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थीनी अंजली वसावे, व धनराट बीटच्या उपक्रमशील पर्यवेक्षिका वैशाली पाटील उपस्थित होते.यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंडार यांनी बालकांचा आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. बीट पर्यवेक्षिका वैशाली पाटील यांनी उपस्थित माता व किशोरवयीन मुलं मुली यांना हिमोग्लोबिन वाढ व वजन वाढ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कुपोषणाचे प्रमुख कारण म्हणजे बालविवाह असून बालविवाह रोखण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना अं. सेविका मार्था खेंगार यांनी केली. अं. सेविका उषा गावित यांनी देखील सात अन्नगटा विषयी माहीती दिली.पोषण विषयक प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आश्रम शाळेचे शिक्षक सुनील गावित यांनी केले.


सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  येथील अंगणवाडी ताई ललिता वसावे,भारती वसावे, रंजना वसावे,प्रियतमा वसावे, कुसुमताई वसावे,उषा गावित,गेजमा गावित , मदतनीस रंजिता गावित यांसह बिट अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राणिकुंड येथिल शिक्षक यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन लता गावित यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या भारत बंदची हाक

Next Post

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई

Next Post
मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

January 26, 2023
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहनाला धडक ; दोन ठार

January 26, 2023
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

उमर्दे येथे शिवीगाळ करुन दमदाटी

January 26, 2023
सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

January 26, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

January 26, 2023
स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित

स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित

January 26, 2023

एकूण वाचक

  • 2,683,910 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group