नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या दि .२७ सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे . राजधानी दिल्ली येथे केंद्रीय झालेल्या शेतकरी आंदोलनाला २८४ दिवसाहून अधिक दिवस पूर्ण झाले असून हे आंदोलन आता एका महत्त्वाच्या टप्प्यात आले आहे . २६ ऑगस्ट रोजीच्या लढ्याला नऊ महिने पूर्ण झाले आहे . या परिषदेला शेतकरी संघटनासोबतच शेतमजूर , कामगार , महिला , युवक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांचे राष्ट्रीय नेते सिंधू सीमेवर आयोजित सभेत उपस्थित होते . त्या परिषदेने एक मुखाने केलेल्या ठरावाद्वारे हा लढा देशभरात प्रखर करण्यासाठी शेतकरी व कामकरी जनतेला संघटीत करून एक दिवसाचा भारत बंद यशस्वी करण्यासाठी संघटनेमार्फत एक परिपत्रक वाटप करण्यात येत आहे . या आंदोलनाला व भारत बंद यशस्वी होण्यासाठी किसान सभा , शेतमजूर युनियन , सी.आय.टी. यु , डी.वाय.एफ.वाय , आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन , शालेय पोषण आहार संघटना , धुळे नंदुरबार कामगार संघटना , एम.एस.एम.आर.ए , आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे .