नंदुरबार
नंदुरबार येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई, वारकरीची पारंपारिक वेशभूषा करीत लक्ष वेधून घेतले. यावेळी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईच्या नामाचा गजर करण्यात आला. तसेच पारंपारिक वेशभुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवुन गौरविण्यात आले.
नंदुरबार शहरातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आषाढी एकादशीचा उत्सव व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाईसह वारकरी भाविकांचीही वेशभुषा साकारली. विठूरायाच्या नामाचा जयघोष करीत कार्यक्रमाला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेतले. तसेच पारंपारिक वेशभुषा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कार्तिक चौधरी याने प्रथम क्रमांक, श्रावणी इथापे हीने द्वितीय क्रमांक तर कुणाल मराठे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
या विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमच्या मुख्याध्यापिका शीतल चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविले. या पारंपारिक वेशभुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना मराठे, रेखा वराडे, संगीता दाबी, निशा गुरव, विजया पवार, निशा गुरव, करीना समुद्रे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.








