Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आषाढी एकादशी निमित्त एम. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून केली साजरी

team by team
June 29, 2023
in शैक्षणिक
0
आषाढी एकादशी निमित्त एम. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून केली साजरी
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा एस. एम. के. डी. एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथील एम. के. डी. इंग्लिश मीडियम (CBSE) शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभागी होत भक्तिमय वातावरणात दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली.
सौ. मीना किशोर दराडे एज्युकेशन सोसायटी नंदुरबारचे संचालक शुभम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या आवारात दिंडी काढून उत्साहामय वातावरणात साजरा करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी  विठ्ठल रुक्मिणी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या बालगोपालांनी टाळ, मृदंग वाजवत विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण शाळेचा परिसर भक्तीमय केला होता.
या दिंडी दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांद्वारे रिंगणही करण्यात आले. शिक्षिका योगिता तांबोळी यांनी विठ्ठलाच्या नामस्मरणाचा महिमा गात ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.बागुल  यांच्या हस्ते दिंडीची आरती ओवाळून पूजा करत ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करत टाळ आणि मृदुंगाच्या ठेक्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी ताल धरला. नृत्यशिक्षक जीत थनवार यांनी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांना नृत्य तसेच फुगडी खेळवत प्रत्यक्षात पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती निर्माण केली. या नयनरम्य आणि भक्तिमय दिंडीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभागी होत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली.
या कार्यक्रमाच्या सफल स्फूर्तीसाठी एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा जाधव, पॉलिटेक्निक कॉलेज प्राचार्य सचिन भोंगळे, शिक्षिका योगिता तांबोळी, मनीषा आंधळे, चरिता पाटील, पल्लवी गवांदे, जीत थनवार, निलेश गावित, विनोद भालेराव, अनिल गावित तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बागुल, श्री.हिरे, भाग्यश्री बच्छाव, भारती मंडलिक, वैशाली वळवी, योगेश सोनार, सागर खारकर, जितेंद्र गावित, कल्पेश पाटील, स्वप्नील पाटील, आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्दे येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add