म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत राजहर्षी शाहू महाराज जयंती व जागतिक अम्ंली पदार्थ सेवन विरोधी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजहर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला यावेळी शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार लिखित दिग्दर्शित पथनाट्य भारत व्यसनमुक्त करूया विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात शाळेचे उपशिक्षक विजय पवार ,दीपक वळवी ,आनंदराव पवार, रामानंद बागले ,हारूनखा शिकलीगर ,संजय बोरसे ,यांनी सहभाग घेतला होता.
पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर व्यसनापासून होणारे दुष्परिणाम ,व्यसनापासून होणारे विविध आजार, व्यसनामुळे परिवारावर होणारे आघात ,असे विविध विषय घेऊन हास्य विनोदी व प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज विषयी व व्यसनाचे होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार दीपक वळवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय वसावे, दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीच्या प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.








