नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील युवारंग फाऊंडेशन नंदुरबार व हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत असलेले बालसंगोपणातील १३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रतापसिंग मोहिते हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भामरे स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक युवराज भामरे, युवरांग फाऊंडेशनचे सचिव राहुल शिंदे, हिरकणी ग्रुपच्या उपाध्यक्षा प्रियंका पाटील, सचिव दिपाली पाटील व सदस्य डॉ.प्रा.सोनल मोरे, आरती पाटील, नीता मराठे हे होते.
प्रस्तावना राहुल शिंदे यांनी मांडली. त्यानंतर युवराज भामरे यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश मंडलिक यांनी केले व आभार युवारंगचे उपाध्यक्ष देवेंद्र कासार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवर्धन लुळे, सुनंदा वाघ, गौतम वाघ, रेणूका मोघे, गौरव पाटील, गणपत पाडवी, महेंद्र कोकणी, सुरेश पाटील, गायत्री माळी, भाग्यश्री पाटील आदींनी परिश्रम घेतले.








