नंदुरबार l प्रतिनिधी
खासदार डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत वाढदिवस आयोजन समिती वतीने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा व धुळे जिल्हा मर्यादित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे दि. २८ जून २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. वयोगट मुले/मूली आठवी ते दहावी साठी 5 कि. मी., पुरूष अकरावी ते सिनीयर कॉलेज यासाठी 10 कि. मी. अंतर व महिला गट अकरावी ते सिनीयर कॉलेज 6 कि. मी. इतके अंतर असेल.
ही स्पर्धा दि. २८ जून २०२३ रोजी वार मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता मखा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापासून – यशवंत विद्यालय – जी. टी. पी. कॉलेज रोड – अंधारे चौक – महाराणा प्रताप चौक – बस स्टँड – नेहरू पुतळा – गांधी पुतळा – उडडानपुल- गिरीवीहार गेट – स्वागत पेट़ोल पंप – करण चौफुली – परत त्याच मार्गे खा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या निवासस्थानापर्यंत या मार्गाने होईल. मॅरेथॉन स्पर्धेसाठी वयोगट व पारितोषिक इयत्ता ११ वी ते सिनीयर कॉलेज- पुरूष 10 कि. मी. 5000, 3000, 2000 तर इयत्ता ११ वी ते सिनीयर कॉलेज महिला 5 कि. मी. 5000, 3000, 2000 आणि इयत्ता 8 वी ते 10 वी मुले 5 कि. मी. 5000, 3000, 2000 व 8 वी ते 10 वी मुली 5 कि. मी.5000, 3000, 2000 असे असेल
ज्या खेळाडूंना वरिल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी खालील कागद पत्रांची पुर्तता व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणारा खेळाडू धुळे व नंदुरबार जिल्हयाचाच रहिवासी असावा. रहिवासी असल्याचा पुरावा म्हणुन आधारकार्ड आवश्यक आहे. खेळाडूंचे प्रवेश अर्ज दि. २७ जून २०२३ तारखेपर्यंत मिनल वळवी (9822490693), सॅबस्टीन जयकर (9075360991), राजेश शहा (9423191312), निलेश गावीत (9764032903), जितेंद्र पगारे (9860545847), रविंद्र सोनवणे (9420085225), दिनेश सुर्यवंशी (9960245432) चेतना चौधरी (9420166918), धनराज अहिरे (8888440729), कबाडे (7745042326). स्पर्धा पुर्ण झाल्यावर एक तास नंतर सर्व गटातील विजयी तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मान प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विजयी झालेला खेळाडू जर नियम व अटींना पात्र ठरला नाहि तर त्यास पारितोषिक दिले जाणार नाही. स्पर्धा पुर्ण करतांना काही तांत्रिक बाबी व अधिकार आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याची आवाहन खा. डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत वाढदिवस आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.








