नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील सिंदगव्हाण येथील महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण येथील लताबाई महादू पाटील या घरासमोरील अंगणातील खाटेवर झोपल्या होत्या. यावेळी हरीष गोकुळ भिल याने लताबाई पाटील यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरीने हिसकावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी लताबाई पाटील यांनी आरडाओरड केली.
दरम्यान या वेळेत हरीष भिल हा पळून गेला. त्यानंतर लताबाई पाटील यांचे पती यांनी हरीष भिल यांच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्यांनाही हरीष भिल याने शिवीगाळ केली. याबाबत लताबाई पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात हरीष भिल याच्याविरोधात भादंवि कलम ३९२, ५११, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.मोतीराम बागुल करीत आहेत.








