नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासुन तीन कि.मी.अंतरावर असलेले भरडु नागन प्रकल्प धरणात एका अज्ञात व्यक्ती चा खुन करून त्याचे हातपाय नायनोलच्या दोर lने बांधून धरणात फेकुन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे ,या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
नवापूर तालुक्यातील भरडु नागन प्रकल्प धरणात काल दुपारी तीन वाजेच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्तीचा शव तरंगताना दिसला. याबाबत पोलीस पाटील महेश वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरुन नवीनच बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील ,पोलीस उप.नि.भुषण बैसणे ,पो.कॉ.अनिल राठोड, भोजराज धनगर, राजु कोकणी अरूण कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांच्या सहकार्य ने मृतदेह बाहेर काढण्यात आले.मयत अज्ञात व्यक्तीचे अज्ञात मारेकरी नी हातपाय नायलॉन च्या दोरी पक्के बांधून धरणात दोन दिवसापूर्वी फेकून खुन केल्या चा प्राथमिक अंदाज आहे.
मृतदेह कुजलेले अवस्थेत होता. यावेळी मासेमारी करणाऱ्या ना ओळख पटविण्यासाठी दाखण्यात आले अद्याप ओळख पटलेली नाही घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे ,गुन्हे अन्वेषण शाखेचे किरणकुमार खेडकर यांनी भेट देऊन मयत व्यक्ती चा संदर्भात ओळख पटविण्याचे आवाहन केले .
या बाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे ,हे.कॉ.अरुण कोकणी,विश्वनाथ नाईक .अनिल राठोड करीत आहे








