Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देणार पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला -सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की

team by team
June 23, 2023
in राज्य
0
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देणार पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला -सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की

नंदुरबार l प्रतिनिधी
 अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार असल्याची असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 महाराष्ट्राचे राज्यपाल  यांच्या 29 ऑगस्ट,2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची  मान्यता मिळाली आहे. तरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज  करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला  प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे.
हा दाखला मिळण्यासाठी उमेदवारांनी तहसिलदारांचे अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र, उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा शासकीय दुध डेअरीच्या मागे, शहादा रोड तळोदा, जि.नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री कुसुम योजना : दिवसाच्या मोफत वीजेमुळे शाश्वत सिंचनाची सोय

Next Post

खळबळजनक घटना : एकाचा खुन करून शव धरणात फेकला

Next Post
खळबळजनक घटना : एकाचा खुन करून शव धरणात फेकला

खळबळजनक घटना : एकाचा खुन करून शव धरणात फेकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add