म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील धानोरा येथे मानव विकास योजने अंतर्गत पहिल्यांदा महाराष्ट्र एस. टी. महामंडळाने बस सुरू केल्याने विद्यार्थी सह पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
धानोरा गावातील ८० ते ९० विद्यार्थी हे आमलाड ता.तळोदा येथे माध्यमिक विद्यालय येथे शिक्षणासाठी रोज ये जा करीत असतात हे विद्यार्थी चार की.मी.पायी,सायकल व मोटर सायकल नी प्रवास करीत होते.यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करून शिक्षणासाठी आमलाड येथे यावे लागत होते त्यामुळे त्यांना खूप अडचणी ला सामोरे जावे लागत होते.
यासाठी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरोत्तम मराठे यांच्यासह शिक्षक रघुवीर कुवर,ज्ञानेश्वर गिरासे,भुवणेश भामरे,सुशील सूर्यवंशी व पालकांनी तळोदा आगार प्रमुख यांच्याकडे तळोदा ते धानोरा बस सुरू व्हावी याची वेळोवेळी मांगणी केली होती ती मांगणी त्यांनी मान्य करून आज ही बस चा शुभारंभ गावाचे माजी सरपंच जगलसिंग ठाकरे,विद्यालयाचे मुख्याध्यापक मराठे,जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक अमोल सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते बस ची पूजा करून श्रीफळ फोडून करण्यात आले.
या बसवर प्रथम आलेल्या चालक रामकृष्ण जावरे व वाहक आर.व्ही,गायकवाड यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ही बस प्रथम गावात आल्याने विद्यार्थी व पालकांनी गर्दी करून सर्वांचे अभिनंदन केले यावेळी मुख्याध्यापक मराठे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,रघुवीर कुवर,ज्ञानेश्वर गिरासे,भुवणेश भामरे,सुशील सूर्यवंशी,यांच्यासह गावातील रणजित ठाकरे, धर्मा भिलावे,तारसिंग भिलावे,बापू पाटील,मोहन पाटील,संजय पाटील व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.








