तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली या सभेमध्ये तळोदा शहराच्या विविध विकासाच्या अजिंठा वरील सर्व 14 विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली परंतु शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ६ व १४ ला आपल्या लेखी विरोध केला होता तसे तसे पत्र त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले. यावेळी तळोदा शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्यासह त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून जोपर्यंत वरील दोन विषयांबाबत लेखी खुलासा मिळत नाही तोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर तीन तास ठिय्या मांडला होता. परंतु या दोन्ही विषयांचा लेखी खुलासा पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांनी दिल्यानंतर तेथून ते परतले.
या सर्वसाधारण सभेत, शासकीय परिपत्रक निर्णय वाचन पालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कर पात्र मूल्यांकन सुधारणा, अनुषंगिक खर्च कमी करणे, को- ओरडूनेत्र पदाना मुदतवाढ, गटारीतील गाळ, कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने लावणे, आरोग्य विभागातील सर्व वाहनांचा विमा उतरविणे, घंटा गाडी दुरुस्ती, एकाकी पदांची कुंठितता घालविणे, श्रीराम नगर, सूर्यवंशी नगर, सुशिला पार्वती नगर, दामोदर नगर, विद्यानगरी, नेमसुशील नगर , सीताई नगर, विष्णुलता नगर, भिकाजी नगर, श्रीजी पार्क याठिकाणी मोकळ्या जागेत झाडे लावणे, तारेचे कुंपण करणे, वृक्ष संवर्धन करणे, नवीन वसाहती कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे, थ्री फेज जोडणी करणे, शासकीय परिपत्रकानुसार व वारसा हक्काने सफाई कामगार नियुक्ती, आदीं सह एकूण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेला नगरसेवक सुभाष चौधरी, संजय माळी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, शोभाबाई भोई, सूनयना उदासी, सविता पाडवी, बेबीबाई पाडवी, अंबिका शेंडे, कल्पना पाडवी, सुरेश पाडवी, अमनुद्दीन शेख, रामानंद ठाकरे, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच यावेळी कार्यालयीन प्रशासकीय प्रमुख राजेंद्र माळी, दीपक पाटील, नितीन शिरसाठ, आश्विन परदेशी, सुनील सूर्यवंशी, युगश्री पाडवी, लेखापाल विशाल माळी, विनीत काबरा, एम एस गावित, दिगंबर माळी, नारायण चौधरी, मोहन सूर्यवंशी,आदी यावेळी उपस्थित होते.