नंदूरबार l प्रतिनिधी
राजे शिवाजी विद्यालय ,नंदुरबार येथे कुणबी पाटील युवा मंच नंदुरबार च्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली
.या सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली कुणबी पाटील युवा मंच तर्फे या वर्षी कुणबी महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले. यामध्ये समाज मेळावा, गुणगौरव समारंभ, सेवानिवृत्त सत्कार तसेच विविध पुरस्कार वितरण समारंभ ,समाज
जागृतीपरा व्याख्यानमाला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे सर्वांनुमते ठरवण्यात आले. तसेच कुणबी पाटील युवा मंचच्या सदस्यांची एक नवीन लिंक तयार करण्यात येईल या लिंकच्या माध्यमातून समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांना या लिंकच्या माध्यमातून सदस्य फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येईल व त्या सदस्यांमधून युवा मंचचे जिल्हा, तालुका, शहर या कार्यकारणीची निवड करण्यात येईल .तसेच कुणबी पाटील समाजाच्या कार्यात ज्या समाज बांधवांना मनापासून समाजाचे काम करायचं असेल त्यांच्यासाठी कुणबी पाटील युवा मंच हे हक्काचे व्यासपीठ आहे असे कुणबी पाटील युवा मंचचेअध्यक्ष दिनेश पाटिल यांनी आपल्या मनोगत सांगितले.
सचिव प्रदीप देसले यांनी सर्व विषयांवर चर्चा करून चर्चेअंती हे सांगण्यात आले की आपल्याला युवा मंचच्या सर्व शाखांमध्ये आरोग्य शिबिर हे घ्यावयाचे आहे. तसेच कैलास पाटील सभापती पाणीपुरवठा विभाग नंदुरबार नगरपरिषद यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांनी पुढे यावे व समाजासाठी वेळ द्यावा. तसेच धनराज भाऊराव बच्छाव, खोंडामळी ज्येष्ठ मार्गदर्शक यांनीही आपल्या मनोगतातुन सांगितले की समाजासाठी मी पूर्ण वेळ देण्यास तयार आहे व युवा मंचच्या कार्यात मी स्वतःला वाहून घेईन असे त्यांनी सर्वांना सांगितले.
तसेच शांताराम पाटील यांनीही कुणबी महोत्सव साजरा करून समाजाचे संघटन करावे असे आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केले व युवा मंचचे काम असेच अविरत चालू राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. उपस्थित समाज बांधवांचे आभार श दिग्विजय पाटील यांनी मांडले व सहविचार सभा यशस्वीतेसाठी रवींद्र भालेराव पाटील, हिरामण पाटील, योगेश पाटील, जितेश पाटील, रुपेश पाटील, राजन देसले जितेश पाटील, निखिल पाटील ,अमृत पाटील खोंडामळी,गणेश बागुल भालेर, वासुदेव पाटील बलवंड, संजय भिमराव पवार नंदुरबार, युवराज पाटील वावद ,लावेश पाटील वावद विशाल पाटील, वावद या सर्वांनी प्रयत्न केले.








