Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

team by team
September 25, 2021
in राज्य
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदारांचे संमेलन आज येथे पार पडले.

नंदुरबार शहरातील एनबीसी मॉल येथे हे संमेलन झाले. जिल्हाधिकारी मनीषा खत्री अध्यक्षस्थानी होत्या. उद्योग अधिकारी दिलीप पाटील, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे एफटीडीओ प्रमोद थावरे, देवा नंद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी वसंत चौधरी आदी उपस्थित होते.

या संमेलनात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांना  निर्यातवाढीसाठी निर्यातक्षम उत्पादने व सेवा तसेच उत्पादनाशी संबंधित निर्यातीच्या संधी व निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया, सेवा, सुविधांबाबत माहिती घेत जिल्ह्यातील उद्योजक व निर्यातदारांशी चर्चा करुन उद्योगांबाबत येणाऱ्या अडी- अडचणी जाणून घेतल्या.

श्री. चौधरी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकार सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगा विषयी माहिती दिली.

प्रास्ताविकात बोलताना श्री. पाटील यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वतीने 20 ते 26 सप्टेंबर या काळात वाणिज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी असून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्र बनविण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.

यावेळी श्री. थावरे,श्री.देवा नंद, श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या संमेलनास जिल्ह्यातील विविध उद्योजक, शेतकरी गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Next Post

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026
रविवारी नंदुरबार येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन

रविवारी नंदुरबार येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन

January 17, 2026
नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

January 17, 2026
गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

January 14, 2026
सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

January 14, 2026
नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

January 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add