Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

team by team
September 24, 2021
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी

नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत 0.5 ते 2 मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करू शकतात आणि जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. अशा परिस्थितीत भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

हे प्रकल्प जमिनीवर सौर प्रकल्पाची उभारणी स्टिल्ट रचना वापरूनही उभारता येतील, जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टीव्यतिरिक्त पिकांच्या लागवडीकरिताही होऊ शकेल. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) अंतर्गत योजनेमध्ये निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. बयाणा रक्कम (EMD) रु. 1 लाख/मेगावॅट , परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG) रु. 5 लाख/मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून 25 वर्षाकरिता रु. 3.10 प्रति युनिट दराने राहील.

या योजनेअंतर्गत महावितरणने 487 मे.वॅ. करिता निविदा जाहीर केल्या आहेत आणि निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टलवर भेट द्यावी.

बातमी शेअर करा
Previous Post

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सुनील रामोशी यांची निवड

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add