Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

Mahesh Patil by Mahesh Patil
September 25, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी

सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका  (डी.एल.एड) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण (खुला) संवर्ग 49.5 टक्के  व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह, प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 24 ते 28 सप्टेंबर, 2021 असा असुन पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे 24 ते 30 सप्टेंबर, 2021, प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी खुला संवर्ग रुपये 200 खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी 100 इतका आहे.

यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरुन मान्यता करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन मान्यता केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरी नंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व संनियत्रण समिती, पुणे तथा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला निर्यातदारांचे संमेलन उत्साहात

Next Post

जि. प. व पं. स. पोटनिवडणूकित आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group