नंदुरबार-
शहरातील नळवा रस्त्यावरील हरिओम नगरातील साईबाबा मंदिरात आठवा वर्धापन दिनानिमित्त आज दि.११ जून २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हरिओम नगरातील साईबाबा मंदिरात सुभाषचंद्र बाबूलाल अग्रवाल, नितेश अग्रवाल यांच्या परिवाराच्या वतीने स्व. शशिकला सुभाष अग्रवाल यांच्या स्मरणार्थ डोम भेट देण्यात आले आहे. साईबाबा मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.११ जून २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आज सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत होम हवन कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता नितेश अग्रवाल यांच्या हस्ते डोमचे उद्घाटन तर सायंकाळी सात वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हरी ओम नगर निवासी साई भक्त परिवाराने केले आहे.








