Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

team by team
June 4, 2023
in क्राईम
0
बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी
नंदूरबार l प्रतिनिधी
 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा गावाजवळ नवापूर हुन येणारी नाशिक नवापूर बस व समोरून येणारा मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. तर बसमधील १५ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेचे पायलट सुभाष गावित, मानसिंग गावित डॉक्टर विशाल गावित यांनी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचार करून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले होते.
यात समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे नाशिक नवापूर बस ( क्र.एम एच.०६ एस.८४९६ ) व समोरून येणारा मालवाहू ट्रक ( क्र.टी.एन.५२.ए ए.२६१३) यांच्यात भीषण धडक झाली. महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून अपघात झाला आहे. या दरम्यान एकाच मार्गवर दोन्ही बाजूची वाहने येजा करत असल्याने सदर अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की मालवाहू ट्रक व बस या दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.
तर ट्रक चालक प्रकाश पालन स्वामी रा.तामिळनाडू हाbआत मध्ये अडकल्याने जागीच ठार झाला आहे. या अपघातात बसमधील योगेश रावसाहेब मरसाळे, संदीप वसंत अंभोरे,मनोज रामदास मांडोळे, मिनाबाई सुभाष अंभोरे, ताईबाई भिका आस्वार,कविता योगेश मरसाळे,आशाबाई रामदास मांडोळे, उषाबाई वसंत आंबोरे, ज्योती जयराम गावित, वनिता अनिल वसावे, राहुल भाऊसाहेब पवार यांच्यासह बस चालक बाळासाहेब सर्जेराव तिडके  वाहक जखमी  असे १५ जण जखमी आहेत.अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तर विसरवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

Next Post

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

Next Post
तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add