Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

team by team
September 24, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
 कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा  अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे . त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिलेली आहे .
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे . ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत . राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र , त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता . मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे . गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या . कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे . शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे . त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून , महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या , नगरपालिका , नगरपंचायत , ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या , शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेचा पाठींबा शेतकरी, व्यापारी, नागरीकांनी बंद यशस्वी करावा प्रहार शेतकरी संघटनेचे आवाहन

Next Post

नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

Next Post
नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात  आढळला कोरोना रूग्ण

नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add