नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात आज कोरोना रुग्ण आढळुन आला आहे.
नंदुरबार शहरात दोन दिवसांपुर्वी २ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यात ४ वर्षीय बालिकेचा ही समावेश आहे. आज सायंकाळी पुन्हा प्रशासनातर्फे १८७ जणांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, यात नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी व नवापूर तालुक्यातील काकरपाडा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे ५ रूग्ण आहेत.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३७ हजार ५४० रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात १५ हजार ९६२, शहादा तालुक्यात १ हजार ६३८, तळोदा तालुक्यात ३ हजार ६६९ , नवापूर तालुक्यात ४ हजार ११२, अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १९६, धडगाव तालुक्यात ८६२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी ३६ हजार ५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० जणांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.८४, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458