नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा.आ.चंद्रकांत रघुवंशी, व्हॉइस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नियतकालिक समितीच्या वतीने ‘शिक्षणाचे बदलते आयाम’ या विषय अंतर्गत शिक्षण :
काल, आज आणि उद्या, नवे शैक्षणिक धोरण (NEP २०२०), शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण आणि समाजमध्यमे (Social Media), शिक्षण आणि मानवी जीवनमूल्ये / संस्कार, शिक्षण आणि रोजगार संधी, कौशल्याधारित शिक्षण, जगातील भारतीय शिक्षणाचे स्थान, व्यावसायिक शिक्षण : काळाची गरज, परीक्षांचा अध्ययन-अध्यापनावरील परिणाम या अनेक उपविषयांवर लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यात स्पर्धेत गायत्री नटराज भंडगर, अक्षदा मधुकर कुलकर्णी, योगिता जयराम माळीच, राम सुदाम ठाकरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम.जे.रघुवंशी यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक रक्कम, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सदर लेखन स्पर्धेच्या आयोजनात नियतकालिक समितीचे चेअरमन प्रा.डॉ. सुलतान पवार, सदस्य प्रा.डॉ.व्ही.एफ.मक्राणी, प्रा.ए.डी.आखाडे, प्रा.डॉ.स्वप्निल मिश्रा, प्रा.जयश्री नायका यांनी परिश्रम घेतले.