नंदूरबार l प्रतिनिधी
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूहच्या माध्यमातून दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव मदत करणार असल्याचे मा.आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले.हिरा प्रतिष्ठान संचलित,सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.शाळेत प्रथम नंदिनी शशिपाल वळवी-88.20 टक्के,द्वितीय किरण संजय राठोड-87.80 टक्के, तृतीय अश्विनी देविदास ब्राह्मणे-87.20 टक्के, चतुर्थ सिद्धी सुभाष कोकणी-86.20 टक्के तर पाचवा क्रमांक पल्लवी ईश्वर कोकणी-86 टक्के मिळविले.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा.आ.शिरीष चौधरी,संस्थेचे उपाध्यक्ष सौ.अनिता चौधरी,संस्थेचे सहसचिव रुपेश चौधरी मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे:शिल्ड, प्रमाणपत्र,रोख रक्कम व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला वभावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मा.आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले की, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या संकल्पनेच्या आधारावर १०० टक्के निकालाची ही परंपरा कायम राखावी तसेच काकासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांना कसे साकार करता येईल व शाळेची प्रगती करिता आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन देत गोर-गरिबरंच्या मुलांना घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनाही आव्हान देऊन कौतुक केले. व शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह च्या माध्यमातून दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले तर श्रीमती.चेतना चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास महेंद्र फटकाळ, विश्वास गायकवाड ,सुधाकर सूर्यवंशी, नितीन साळी,अमोल भदाणे,उज्वला चौरे,नयना सोनवणे, युवराज भामरे सतीश काटके ,गणेश पवार,हितेश चव्हाण,विशाल साळवे ,अभिनय ठाकरे उपस्थित होते.