नंदूरबार l प्रतिनिधी
शासनामार्फत जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शहादा तहसिल कार्यालयामार्फत सारंगखेडा येथे नुकतेच शासन आपल्या दारी हे शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात सांरगखेडा मंडळातंर्गत 11 गावातील लाभार्थ्यांना विविध योजनेतंर्गत उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, गरजू व्यक्तींना शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे इत्यादी फॉर्म वाटप, विशेष सहाय्य योजनेचे फॉर्म वाटप व स्वीकृती, पोट खराब जमिनी लागवडी खाली समावेशन केल्याचे आदेश वितरण, नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती, तसेच महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना यावेळी देण्यात आली.
शिबिर यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार कल्पेश जाधव, सारंगखेडाचे सरपंच पंकज रावल, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी जयेंद्र अहिरे, सोमनाथ जाधव, जयवंत पाटील, संपना चित्ते, कोतवाल भूपेंद्र गिरासे, सतिष तिरमले, सुनिता पाडवी यांनी सहकार्य केले. यावेळी पंचायत सदस्य, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.