नंदूरबार l प्रतिनिधी
तीसी ता.नंदुरबार येथील दोन महिलांना २०२३-२४ या वर्षाकरिता ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्कार सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, स्री विरुद्ध अन्याय-अत्याचार बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना आत्मनिर्भर करणे आदी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल अंगणवाडी सेविका श्रीमती प्रिया चतुर पाटील व बचत गट अध्यक्ष रोहिणी मच्छिंद्र पाटील यांचा शाल श्रीफळ पुरस्कार प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत कार्यालयात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपसरपंच रतनसिंग भील, बारकू भील, ॲड. राहुल पाटील,भगवान भील,ग्रामसेवक एन.पी. दहिफळे पदाधिकारी ग्रामस्थ अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.