नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील दोन महिलांना २०२३-२४ या वर्षाकरिता ग्रामपंचायत स्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर पुरस्कार सरपंच शोभाबाई पाटील यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.शोभाबाई पाटील यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी उपसरपंच गजानन पाटील,पी.पी. बागुल, डॉ. राकेश पाटील, पि.के. पाटील, नाना पाटील, पंडित भील,रमेश पाटील,आनंदा पवार विजय पाटील आदी पदाधिकारी सह ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात स्त्रीभ्रूणहत्या बालविवाह स्री विरुद्ध अन्यायअत्याचार आदी सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल अंगणवाडी सेविका वैशाली प्रमोद रोडे व आशा सेविका चंद्रकला नवल पाटील यांचा शाल श्रीफळ पुरस्कार प्रमाणपत्र देऊन ग्रामपंचायत कार्यालयात पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.