नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलची इयत्ता ९ वीची विद्यार्थीनी प्रिती नितीन पाटील हिने ऑलम्पिक खेळ कात्रण वही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये ऑलम्पिक खेळ कात्रण वही स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या गटात प्रिती नितीन पाटील (इ.९ वी, ब) या विद्यार्थीनीने ऑलम्पिक स्पर्धेतील आवडलेली उत्कृष्ट क्षणचित्रे, खेळांची माहिती आदींची सुंदर कात्रणांची आकर्षक मांडणी करून एक वही तयार करुन ती स्पर्धेसाठी सादर केली. यात उत्कृष्ट संकलन(क्षण चित्रे) महत्वपूर्ण माहिती व आकर्षक मांडणी केलेल्या वहीस प्रथम (गोल्ड मेडल) द्वितीय (सिल्वर मेडल) तृतीय (ब्रॉंझ मेडल) असे क्रमांक काढून बक्षिस देण्यात आले. यात प्रिती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर वैष्णवी दिपक जोशी (इ.८ वी, ब) द्वितीय, तर हर्ष पवार (इ.९ वी ई) याने तृतीय क्रमांक पटकाविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस देवून शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदिश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा यांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी, त्रिवेदी, सीमा पाटील, नरेंद्र सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.