नंदुरबार l प्रतिनिधी
27 मे शनिवार रोजी स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी सूर्य बरोबर डोक्यावर आला व नंदुरबारकरांची सावली हरवली. खरं म्हणजे 12 वाजताच सूर्य डोक्यावर येतो पण स्थानिक वेळेप्रमाणे नंदुरबारकरांच्या डोक्यावर 12 वाजून 32 मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो. भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर 82.5 पूर्व रेखावृत्त हे भारताच्या मध्यातून अलाहाबाद येथून जाते, अलाबादची वेळ ही प्रमाण वेळ मानली जाते व नंदुरबार हे ७४.१२ पूर्व रेखांशावर आहे व प्रत्येक रेखांशात 4 मिनिटांचा फरक असतो अलाहबाद व नंदुरबार यात 8 रेखांशाचा फरक असल्याकारणाने आपण नंदुरबार कर प्रमाण वेळेपासून 32 मिनिटे पुढे आहोत.
यावेळी अनेक विद्यार्थी पालकांनी व नागरिकांनी या घटनेचा अनुभव घेऊन आनंद व्यक्त केला. याप्रसंगी नक्षत्र छंद मंडळांनी तयार केलेल्या उपकरणांच्या सहाय्याने निरीक्षण करण्यात आले.
त्यात आदित्य नावाचे सोलर डायल व भास्कर नावाचे सोलर ट्रॅक्टर हे उपकरण असून आदित्यला एकच सेटिंग आहे त्यावरून स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हे निश्चित सांगता येते. परंतु भास्करला पाच प्रकारे सेट केले जाते. उत्तर दिशा निश्चित करणे,स्थानिक वेळ निश्चित करणे, अक्षांश -आपण ज्या ठिकाणाहून निरीक्षण करतो त्या ठिकाणच्या अक्षांश लावून घेण, रेखांश -ज्या ठिकाणाहून निरीक्षण करतो त्या ठिकाणचे रेखांश लावून घेणे .
उत्तरायण व दक्षिणायन. या प्रकारे सेटिंग केल्यावर उपकरणावरील यष्टी यंत्र हे शून्य सावली दाखवते.
किंवा यष्टी यंत्रावर शून्य सावली आली तर या पाच सेटिंग आपोआप होतात. वर्षभर सोलर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सूर्याचे निरीक्षण करणे व त्याचा अभ्यास करणे हा उपक्रम नक्षत्र छंद मंडळामार्फत घेतला जात असतो.
नक्षत्र छंद मंडळाचे सदस्य असलेले विद्यार्थी व नागरिकांसाठी वर्षभरात विविध कार्यशाळा घेतल्या जातात.
शून्य सावलीचा आनंद घेताना पाईप, ग्लास, उभ्या राहणाऱ्या वस्तू व स्वतः आपण सूर्यप्रकाशात उभे राहिल्यावर आपली सावली पायाखाली जाते या सर्व गोष्टींचे निरीक्षण करण्यात आले.
यावेळी उपस्थित त्यांनी वर्तुळ करून शून्य सावलीचा आनंद घेतला याप्रसंगी खगोल अभ्यासक चेतना पाटील यांनी संपूर्ण उपक्रमाविषयी माहिती दिली.नक्षत्र छंद मंडळाचे समन्वयक दिनेश पाटील सदस्य प्रज्ञा वडनगरे, चेतन नांद्रे, दिपाली सूर्यवंशी, रवींद्र डोळे, आकांक्षा डोळे , दिशा पाटील, सतीश पाटील,शशिकांत गवळी, विद्यार्थी अथर्व, अर्णव,दिव्यांश,कार्तिक, दर्शन,आर्या,समीक्षा, कल्याणी, शुभ्रा, वृंदा, यज्ञा,अंकित,सिध्दार्थ, दिपेश, वृत्तिका आदी उपस्थित होते.