नंदूरबार l प्रतिनिधी
सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर साक्री गावालगत असलेल्या नवकार मोटर्स जवळ युरिया केमिकल टाकण्यास आलेल्या ट्रक चालकास नवकार टाटा मोटर्स येथे कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याचा ट्रक चालकांशी वाद झाल्याने ट्रक चालकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन ट्रक चालकांवर नवापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

राजस्थान येथून हैदराबादच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर साक्री गावालगत नवकार टाटा मोटर्स सर्विस स्टेशन येथे युरिया गाडीत भरण्यासाठी आले असता त्या नवकार मोटर्स ठिकाणी मालट्रक मध्ये युरिया भरणा करत असताना तेथील कर्मचाऱ्यांशी ट्रक चालकाचा वादविवाद झाला त्या अनुषंगाने ट्रक चालकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसरा ट्रक चालक देखील त्या ठिकाणी आला असता त्यास देखील कर्मचारी व त्याचे सहकारी मारहाण केली तसेच पहिल्या ट्रक चालकास चा महामार्गावर पाठलाग करत इच्छापुर गावाला लगत रस्त्यात गाठून त्यास मारहाण करून त्या ट्रकचे पुढील काचा तसेच इतर साहित्याचे दगडे मारून नासधूस करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच ट्रक मध्ये असलेली रोख रक्कम देखील लांबिवली असल्याचे ट्रक चालक यांनी सांगितले.
त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात गाजी खान रा. जैसलमेर (राजस्थान) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी महामार्गावरील पर राज्यातील वाहनधारक भयभीत झाले असून अशा घटनेतून परिसराची बदनामी होत आहे. पर राज्यातील वाहन चालक यांची अशाप्रकारे जर मारहाण करून लूटमार होत असेल तर स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करणेबाबत ठोस पावले उचलावीत. अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.








