Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे ११ लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

team by team
May 27, 2023
in क्राईम
0
सारंगखेडा येथे ११ लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त
नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील बडोदा येथून विनापरवाना येणारे ११ लाख किमतीचे ८५७ पाकीट कापूस  बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने  सापळा रचून सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले.  यावेळी ११ लाख किमतीचे बियाणे व वाहन जप्त करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दि.26 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याचे समजले, त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र  पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी सापळा रचून वाहन ( क्र. GJ 06 PC 3532) अडविली व विचारपूस केली असता, वाहनचालक चंद्रकांत पांढुरंग माळी रा. कळंबु ता. शहादा याने विनापरवाना बियाणे बडोदा गुजरात राज्य येथून आणत असल्याचे कबुल केले.
विभागीय कृषी सहसंचालक, नासिक विभाग, नासिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार तानाजी खर्डे  व प्रकाश खरमाळे कृषी विकास अधिकारी जि. प. नंदुरबार, तसेच संजय शेवाळे तंत्र अधिकारी गुण नियंत्रण यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरील वाहनात एकूण 17 पोते ( 657 पाकिटे) अंदाजीत रक्कम 11 लक्ष 57 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपीवर बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत सारंगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळे-सुरत मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना

Next Post
शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add