बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरद ता.तळोदा येथील तरुण व मॉडर्न इंग्लिश स्कूल चा मनमिळाऊ माजी विद्यार्थी चेतन (किसन) कोळी ( वय २२) याचा विवाह दि.२९ मे २०२३ रोजी घटिक मुहूर्तावर शिंदखेडा येथील राजेंद्र श्रावण निकुंभ यांची कन्या दिपाली हिच्याशी विवाह निश्चित झाला होता.तत्पूर्वी तो अहमदाबाद (गुजरात) याठिकाणी नोकरीला होता.लग्नानिमित्त काही दिवसांच्या रजेवर तो घरी आपल्या बोरद या गावी परतला होता.लग्नाचा उत्साह असल्याने तो व घरचे सर्व खुष होते.
तो स्वतः लग्नाच्या पत्रिका गावात मोठ्या आनंदाने वाटप करत होता. व प्रत्येकाला आग्रहाने आमंत्रित करीत होता. दि.२५ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजता तो बाथरूम मध्ये काहीतरी काम करीत असताना अचानक त्याची प्रकृती खराब झाली व तो त्याठिकाणी खाली कोसळला .त्याबाबत आवाज झाल्याने जवळ असलेल्यांनी बाथरूम मध्ये जाऊन बघितले असता.तो अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला.तेवढ्यात घरचे सगळेच तसेच मित्रमंडळी त्याठिकाणी जमा झाल्याने त्याला लागलीच शहादा येथे खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचे निश्चित झाले.परंतू काळाचा घाव एवढा मजबूत होता की,काळाने त्याला शहादा पर्यंत देखील पोहचू दिले नाही.रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.आणि त्याच्या नातलागवर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत गावात हळहळत व्यक्त करण्यात येत आहे. बोरद देखील देविदास गोपाळ शिरसाठ यांचा पुतण्या व कै. राजाराम गोपाळ शिरसाठ यांचा चेतन उर्फ किसन हा मुलगा त्याच्या निधनाने संपूर्ण बोरद गाव बंद ठेवण्यात आले.
ज्याच्या लग्नाला जाण्यास गावकरी उत्साहित होते.त्याच्या प्रेतयात्रेत गावकऱ्यांना जावे लागले.त्याच्या प्रेतयात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले.परंतू प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आल्यावाचून राहिले नाहीत. त्याच्या पश्चात आई, काका,काकू,३ बहिणी, चुलत भाऊ, मेव्हणे असा परिवार आहे.काकांचा मुलगा निलेश यांने अंत्यसंस्कार केले.








