Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे विधानपरिषदेचे आ.आमश्या पाडवीनी भरवला जनता दरबार

team by team
May 26, 2023
in राजकीय
0
धडगाव येथे विधानपरिषदेचे आ.आमश्या पाडवीनी भरवला जनता दरबार
नंदूरबार l प्रतिनिधी
 सामान्य नागरिकांच्या विविध सरकारी  कार्यालयाशी संबंधित प्रलंबित कामे, तक्रारी वा  प्रश्न असतात, बऱ्याचवेळा त्यांना दाद मिळत नसल्याने एकाच ठिकाणी जनतेचे प्रश्न सुटावेत याउद्देशाने धडगाव तहसील कार्यालयात विधानपरिषचे आ. आमश्या पाडवी यांनी जनता दरबार भरवला.
यावेळी सर्व सामान्य  जनतेची गाऱ्हाणे आ. पाडवीनी ऐकून घेत काही अधिकाऱ्यांना  जागेवरच घेरल्याचे  या जनता दरबारात दिसून आले. या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, बांधकाम, आरोग्य, कृषी,शिक्षण, वनविभाग,पोलिसविभाग , आरोग्य,वीज मंडळ, महिला व बालविकास या सह सर्वच विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यां विरोधात जनतेने तक्रारी, प्रश्न व गाऱ्हानी मांडल्या यात  तोरणमाळच्या पायथ्यापासून ते हुंडा रोषमाळ  पर्यन्तच्या अतिदुर्गम भागातील नागरिकांसह तालुक्यातील कानकोपऱ्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वच विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात जनतेने आ. पाडवी यांच्या पुढे तक्रारी केल्या.
यावेळी काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने खडसावत कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यावेळी आ.श्री.पाडवी यांनी जाब विचारत तंबी दिली. यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित सातबारा नोंदी व दुरूस्ती, शिधापत्रिका, पीएम किसान, वनपट्टे दावे, कृषी विभागाच्या योजना, रोहयो व  वनविभागतल्या अडचणी, तोरणमाळ व गौऱ्या भागात पाणी टँकर चालु करण्याविषयी सूचना  आमदार पाडवी यांनी तहसीलदार यांना सूचना केल्या.
यात पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, वनविभाग, बांधकाम सह बाकी विभागांसंदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश  पराडके, जि.पसमाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेना जिल्हा संघटक रामभाऊ वाडीले, शिवसेना जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, जिल्हा  समन्वयक रोहित चौधरी,सामाजिक कार्यकर्ते गोलू चंदेल,जसू पवार, हर्षल बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असतांना याविषयी अनेक गावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या.मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
   शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊन शासकीय योजनाविषयी जनजागृती करण्यात यावी असे आवाहन  विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकी दरम्यान केले.
बातमी शेअर करा
Previous Post

बेपत्ता झालेल्या 1 हजार 207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश

Next Post

शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप

Next Post
शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप

शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add