Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के

team by team
May 26, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के
नंदुरबार l प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयातील नियमीत विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९३.०३ टक्के लागला आहे. जिल्हयात ९४.८४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या  आहेत तर ९०.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेसाठी आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. शहरातील विविध सायबरवर विद्यार्थी व पालकांची निकाल पाहण्यासाठी गर्दी दिसून आली. तर अनेकांनी दिलेल्या संकेतस्थळांच्या माध्यमातून घरी मोबाईलवर निकाल पाहिला. निकाल पाहिल्यानंतर त्याठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला. नंदुरबार जिल्हयात एकुण १६ हजार ५२५ नियमीत विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते. त्यातील १५ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हयाचा एकुण निकाल ९३.०३ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा ९८.१२ टक्के सर्वाधिक निकाल
नंदुरबार जिल्हयात विज्ञान शाखेत ८ हजार ९२९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ४ हजार ६६६ विद्यार्थी व ४ हजार ९६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.१२ टक्के लागला आहे.
तर कला शाखेत  ६ हजार ४१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५ हजार ४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ३ हजार ६ विद्यार्थी व २ हजार ४६७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. कला शाखेचा निकाल ८५.३८ टक्के लागला.
वाणिज्य शाखेत ८९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ४९० विद्यार्थी व ३७४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९६.९६ टक्के लागला.
व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी १५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १२० विद्यार्थी व २० विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमाचा निकाल ९३.३३ टक्के लागला.
तांत्रिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तांत्रिक विज्ञानचा निकाल ९० टक्के लागला आहे.
नंदुरबार जिल्हयात १६ हजार ६२५ विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ३८४ विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी ७ हजार ३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ९४.८४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्य आहेत.तर ९ हजार २४१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ९०.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

नंदूरबार येथे मोटरसायकलीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पोलीसांसह तिघांना मारहाण

Next Post
नंदूरबार येथे पोलिस हवालदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार येथे मोटरसायकलीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पोलीसांसह तिघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add