नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरासह तालुक्यातील दोन रुग्ण दोन दिवसापूर्वी कोरानामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.त्यामुळे जिल्ह्यात एकच कोरोना रुग्ण होता दरम्यान काल नंदुरबार शहरात पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.
नंदुरबार शहरातील हरचंद नगर व तालुक्यातील नळवा येथे काही दिवसांपुर्वी कोरोनारूग्ण आढळले होते.
ते कोरानामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.त्यामुळे जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर येथील एकच कोरोना रुग्ण होता.
दरम्यान काल दि. 22 सप्टेंबर २०२१ रात्री 10.30 वाजेला
94 जणांची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त झाला त्यात ९४ पैकी 2 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.हे रुग्ण नंदुरबार शहरातील असून यात ४ वर्षीय बालिकेचा ही समावेश आहे.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३७ हजार ५३८ रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात १५ हजार ९६१, शहादा तालुक्यात १ हजार ६३८, तळोदा तालुक्यात ३ हजार ६६९ , नवापूर तालुक्यात ४ हजार १११, अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १९६ , धडगाव तालुक्यात ८६२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी ३६ हजार ५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.८८, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.