नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून घरफोडिसह जि.प.शाळामध्ये चोरीचे सत्र वाढले होते. शहादा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चोरी झालेल्या तसेच इतर दोन अशा एकुण १८ गुन्हयांचा तपास पोलीसांनी लावला आहे . याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची सुत्रे हातात घेतल्यानंतर नाउघड मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांचे कुलूप तोडून इनव्हर्टर , बॅटरी व एलइडी टीव्ही चोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत . तसेच जिल्हा परिषद शाळेमधील चोरीची पध्दत ही एकच असून चोरी करणारी टोळीदेखील एकच असल्याने पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन केले .त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमधील चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन चोरी होणारे ठिकाण , वेळ , दिवस यांची इत्यंभूत माहिती घेवून पथकाला सुचना दिल्या . दि .२३ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे श्री.कळमकर यांना चिरडे ता . शहादा गावात एक इसम कमी किंमतीत व विना बिल पावती इनव्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन चिरडे येथे पाठविले . तेथे सापळा रचून संशयीत इसमास इनव्हर्टर व बॅटरीसह ताब्यात घेतले . सदर इसमाने त्याचे नाव सोमनाथ ऊर्फ सोमा काशिनाथ दशरथ रा.सुलवाडे ता.शहादा असे सांगितले . त्याने अजय आंबालाल मोरे रा.सुलवाडे ता.शहादा , अजय ऊर्फ टाईगर राजु पावरा रा . ब्राम्हणपुरी ता.शहादा यांचे व सुलवाडे , ब्राम्हणपुरी या गावातील तसेच इतर साथीदारांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले .जिल्हा परिषद शाळा जवखेडा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा . पिंप्री ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा गोगापूर ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा होळ मोहिदा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा तिखोरा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा परिवर्धा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा सावखेडा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा गोदीपूर ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा भादे ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा पाडळदा ता.शहादा , जिल्हा परिषद शाळा डामरखेडा ता.शहादा , ग्राम पंचायत कार्यालय सावखेडा ता.शहादा , तिखोरा येथील मंदीर चोरी ता . शहादा , ब्राम्हणपुरी येथील तेलाच्या टाक्या चोरी ता.शहादा , शेतकी विद्यालय , कळंबू ता.शहादा , टवळाई ता.शहादा येथील अल्युमिनीयम तार चोरी , रायखेड ता.शहादा येथील टायर चोरी , जिल्हा परिषद शाळा , काथर्दे ता.शहादा येथील चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली . तसेच नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वस्तुंपैकी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांकडुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विविध कंपनीचे एकुण ९ ल्युमिनस , एक्साईड मायक्रोटेक कंपनीचे इनव्हर्टर ९ एक्साईड बॅटरी , २ टीसीएल कंपनीचे एलईडी टीव्ही , ०२ इन्टेक्स कंपनीचे होम थिएटर , १ एलसीडी मॉनिटर , १ फॉर्म्युनर कंपणीचा स्टँड फॅन व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकुण ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे . याशिवाय सारंगखेडा व म्हसावद येथील प्रत्येकी १ अशा १८ घरफोडीचे गुन्हे उघडकिस आले आहेत . जिल्ह्यातील इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीचे गुन्हे देखील उघडकीस येतील असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले .सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक गोपाल चौधरी , जितेंद्र अहिरराव , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे , अविनाश चव्हाण , सतिष घुले यांच्या पथकाने केली .