नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे नर्सेस संघटनेच्या वतीने १२ मेपासून परिचारिका दिनापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
सप्ताहात जिल्ह्यात नर्सेस संघटनेकडून परिचारिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. १२ मे रोजी आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त उपक्रमाला प्रारंभ झाला. उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याआणि हस्ते नर्सेस संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिचारिकांनी करण्यात आले. यावेळी अतिरिक्त रुग्णसेवेची शपथ घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पुंड,साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. परिचारिका ह्या आरोग्यव्यवस्थेचा आला एल. बावा, सहायक जिल्हा आरोग्य कणा असून, त्यातून जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी बळकट ठेवण्यासाठी साहाय्य करत उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व आहेत. येत्या काळात असे कार्यक्रम परिचारिकांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमात सर्व नर्सेस भगिनींनी कॅण्डल हातात घेऊन शपथ घेण्यात आली व कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सर्व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान केला व सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह म्हणून त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला तसेच दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले जसे गायन स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,फॅशन शो व ग्रुप डान्स असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्पर्धकांना सुद्धा गुणगौरव सन्मानचिन्ह म्हणून ट्रॉफी देण्यात आली या कार्यक्रमासाठी ते संघटनेतील पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रम आयोजित केला व तो उत्तम प्रकारे होण्यासाठी नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष ज्योती संदानशिव, उपाध्यक्ष अनिता वळवी, कोषाध्यक्ष सिंधू गवळी, कार्याध्यक्ष अमृता पाटील, सरचिटणीस वैशाली फटकाळ, सरला तिरमले, भारती ठोके, अरुणा वळवी, भावना वळवी, कविता राठोड, पूजा पवार, रेखा मेसरे यांच्यासह सेविकांनी परिश्रम घेतले. सप्ताहात जिल्ह्यातील सेविकांनी सहभाग नोंदवला.








