नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालक्यातील पळाशी येथील व्यापाराकडून गहू व चना धान्य खरेदी करुन दोन महिने उलटूनही त्याचे पैसे न देता सुमारे ९० लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे शिरीष नारायण अग्रवाल यांचे श्री रामदेवजी ॲग्रो प्रॉडक्टसचा कारखाना आहे. सदर कारखान्यातून मे.जे.जे.जे.प्रॉडक्सस प्रा.लि.भिवंडी जि.ठाणेचे डायरेक्टर रवि किशोरभाई पाऊन व आशा रवि पाऊन यांनी शिरीष अग्रवाल यांचा विश्वास संपादन करुन पळाशी येथील कारखान्यातून गहू व चना धान्य माल विकत घेऊन त्याचे ८९ लाख २ हजार २३५ रुपये न देता फसवणूक केली.
याबाबत शिरीष अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात रवि किशोरभाई पाऊन व आशा रवि पाऊन या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.








