Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तहसील मध्ये रेशनकार्ड साठी एक हजाराची लाचप्रकरणी ऑपरेटरसह खाजगी पंटरला अटक

team by team
May 18, 2023
in क्राईम
0
नंदूरबार तहसील मध्ये रेशनकार्ड साठी एक हजाराची लाचप्रकरणी ऑपरेटरसह खाजगी पंटरला अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार येथील तहसिल कार्यालयातील खाजगी लेखनिक व संगणक ऑपरेटर यांनी रेशनकार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला रंगेहात सापडल्याने दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तक्रारदार यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालय येथे अर्ज व कागदपत्रे बनविली होती. यावेळी खासगी लेखनिक वसीम बशीर पिंजारी याने तक्रारदारास रेशनकार्ड बनवून देणार असल्याचे सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा करुनही रेशनकार्ड मिळाले नाही.
दि.९ मे  रोजी वसीम पिंजारी याने तक्रारदाराकडे रेशनकार्ड बनवण्यासाठी १ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने  लाच लूचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे तक्रार केली. त्यानंतर १६ व काल दि.१७ मे रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत संशयित वसीम याने स्वत:साठी ७०० रुपये व संगणक ऑपरेटर विशाल शिशूपाल घुगे याच्यासाठी ३०० रुपये अशी १ हजार रुपये लाचेची मागणी केली. काल खासगी इसम वसीम पिंजारी यास तहसील कार्यालय येथे पंच साक्षीदारांसमक्ष १ हजार रुपये लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
दोघा संशयितांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ तसेच पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, विजय ठाकरे, ज्योती पाटील, पोना.अमोल मराठेे, मनोज अहिरे, संदिप नावाडेकर, देवराम गावित, जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूकांची मतमोजणी  19 मे ला तहसिल कार्यालयात होणार

Next Post

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज निवड

Next Post
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज  निवड

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add