Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध करा,मराठा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे

team by team
May 9, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध करा,मराठा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे
नंदुरबार । प्रतिनिधी
  जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची नितांत आवश्यकता असुन छत्रपती शाहु महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत वसतीगृह निर्माण करण्यात यावे या मागणीचे निवेदन नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
 याबाबत निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आपल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणासाठीच्या संविधानिक न्याय व हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला होता आणि आहे.परंतु आजपर्यंत कुठल्याही राज्य सरकारने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा न्याय मिळवुन दिलेला नाही.त्यामुळे मराठा समाजातील गरीब व होतकरु विद्यार्थी हतबल होवुन नैराश्याकडे वाटचाल करीत आहेत. बहुतांश मराठा बांधव रोजगारासाठी गुजरातकडे व मोठ्या प्रमाणात शहराकडे छोटया -छोटया रोजगारासाठी जात आहे.
या नैराश्यातुन बाहेर काढुन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी समाजातील विद्यार्थ्यांना एस.सी.,एस. टी. व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांची नितांत आवश्यकता असुन छत्रपती शाहु महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत वसतीगृह निर्माण करुन ते नियमित करावे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करेन व याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी ताराचंद शिंदे, रोहिदास साळुंखे, कृऊबा संचालक अमृत गायकवाड,  सरपंच राजू पांगारे, उपसरपंच प्रशांत हराळ, ग्रा.पं.सदस्य धनराज भवर, ग्रा.पं.सदस्य धनराज कदम , उपसरपंच शरद गवळी, प्रल्हाद बोराणे, सुभाष पवार, ज्ञानेश्वर कदमबांडे , ॲड.मोहन पवार, पत्रकार हिरालाल मराठे, ज्ञानेश्वर मोठे, दत्तू वाळे, देवा वाळे, गोपाल शेळके, संदीप वाळे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर शिंदे, रघुनाथ नवाळे, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

Next Post

तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध

Next Post
तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध

तळोदा खरेदी विक्री संघ बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add