Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 22, 2021
in शैक्षणिक
0
प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

शिक्षक ध्येय संस्था, नाशिक तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार येथील कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रा.सरदार गुंजार्‍या पावरा यांना जाहीर झाला आहे.  कोरोना पार्श्‍वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात पश्‍चिम खान्देश भगिनी सेवा मंडळाचे अध्यक्ष अतुल अजमेरा तसेच सचिव सौ.स्मिता अजमेरा यांच्या हस्ते नुकतान प्रा.पावरा यांना प्रदान करण्यात आला.

राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांना शिक्षक ध्येय संस्था, नाशिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या पुरस्कारामागील हेतू आहे. प्रा.सरदार पावरा हे येथील कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी कोरोना काळात विद्यार्थीनींसाठी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ उपक्रम उपक्रमातर्ंगत नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थिनींच्या घरोघरी जावून पुस्तके, नोट्स, मास्कचे वाटप केले. तसेच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धेचेही आयोजन केले. मतदान जनजागृती अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेत विद्यार्थीनींचा सहभाग, १ जानेवारीला नवीन वर्षातील बदल व मागील वर्षातील महत्त्वाच्या घटना तसेच जीएसटी सारखे विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले. प्रा.पावरा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्या सौ.वंदना पाटील, प्रभारी उपप्राचार्य बी.सी.पवार, उपमुख्याध्यापक एस.एम.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. प्रा.पावरा यांना प्रा.दिनेश सुर्यवंशी, प्रा.वैभव चव्हाण, प्रा.ए.एम.खिंवसरा, प्रा.अक्षय अहिरे, रोहित पटेल, नरेंद्र बोरसे, जितेंद्र चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रवासी तिकिट तपासणी पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ – मनीषा सपकाळ

Next Post

ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचे सहभाग

Next Post
ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचे सहभाग

ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचे सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

February 4, 2023
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे  महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

February 4, 2023
दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

February 4, 2023
दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

February 4, 2023
युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

February 4, 2023
 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

February 4, 2023

एकूण वाचक

  • 2,731,059 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group