नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्यात त्रिशा गणेश भामरे, हितांशा भानुदास भामरे व जिग्नेश भानुदास भामरे या एकाच कुटूंबातील तिघांनी पदके मिळवुन यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मागील वर्षांत पहिलीच्या एकुण चार विभागामधुन 7 विद्यार्थी पदके प्राप्त केली आहेत. त्यापैकी नंदुरबार विभागात पाच विद्यार्थी असुन त्यात तीन पदके एकाच कुटूंबातील भामरे बंधुंनी मिळवुन यश संपाद केले आहे. त्रिशा गणेश भामरे ही गोल्ड मेडालिस्ट तर हितांशा भानुदास भामरे व जिग्नेश भानुदास भामरे या दोघांनी सिल्वर मेडालिस्ट पदके मिळविली आहेत. त्यात विशेष म्हणजे जिग्नेश भामरे याने सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत सलग तिसर्यांदा पदक मिळविले आहे. त्रिशा ही नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांची मुलगी तर हितांशा व जिग्नेश हे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी भानुदास भामरे यांची मुलगी व मुलगा आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर व शिक्षकांनी कौतुक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक खैरनार, साठे, शितल, कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.