नंदुरबार l प्रतिनिधी
येथे समता युवा मंच तथा महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने दर सालाबादाप्रमाणे समताभूषण व समतारत्न पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमारजी गावित, खा.डॉ.हिना गावित , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, साहित्य कला व सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळ, पत्रकारितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतांना जाती धर्माच्या भिंती तोडून समाजात समता,न्याय व बंधुत्व प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करून एक चांगले कार्य करत समाजात एक आदर्श निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्वांची निवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असतो.
या वर्षी समतारत्न पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांची निवड करण्यात आली होती.
ना.डॉ.विजयकुमार गावित, डॉ.हिना गावित डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व समतारत्न पुरस्कार देऊन प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आर.पी. आय (A) युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख मान्यवर यांच्यासह समता युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.