नंदुबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिल्वर झोन गणित ओलंपियाड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात शाळेकडून इयत्ता चौथीत शिकणाऱ्या शानघा समर्थ हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा इतिहासात मानेचा तुरा रोवला आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते. तसेच परीक्षेत विद्यार्थी सहभागी होत आपल्यातील विशेष नैपुण्य सादर करीत शाळेचा नावलोकिक केला आहे.
भारतात होणाऱ्या नानाविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते आणि अशा परीक्षेत शाळेकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते.आंतरराष्ट्रीय पातळीवर. सिल्वर झोन ओलंपियाड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात इयत्ता चौथीत शिकणाऱ्या शानघा सुजित समर्थ हिने 200 पैकी 200 गुण प्राप्त करत सुवर्णपदक, शिष्यवृत्ती पुरस्कार व पारितोषिक प्राप्त केले.या सिल्वर झोन ओलंपियाड परीक्षेत तिने लेवल दोन या श्रेणीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या सदरचा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणारी शानघा ही जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी असून तिने कौतुकास्पद कामगिरी करत शाळेचा नाव लोकिक केला आहे. या सिल्वर झोन गणित ओलंपियाड परीक्षेत तिने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी कौतुक करीत तिला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.