नंदुरबार l प्रतिनिधी
प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे.
अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन आणि लढ्यासाठी आज सोमवार दि.1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 11 वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महेंद्र चौधरी यांनी म्हटलेआहे की, अतिक्रमण मोहिमेत ज्या नागरिकांची अतिक्रमित दुकाने, घरे, जमीनदोस्त करण्यात आली आहेत.त्यांचे पुनर्वसन करणे याकरिता अन्याविरोधात सर्वांनी एकजूट होऊन अतिक्रमण हटाव मोहीम यांच्याशी शांततेने आणि सन्मानाने लढा देण्यासाठी चर्चा करण्यात येईल.अन्यायग्रस्त नागरिक, व्यावसायिकांनी आज सोमवार दि. 1 मे रोजी सकाळी 11 वाजता मंगळ बाजार परिसरात आयोजित बैठकीस उपस्थित राहावे व आपल्या सूचना देखील मांडाव्यात असे आवाहन महेंद्र मंगा चौधरी यांनी केले आहे.