नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील इसामु नगरात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून नातेवाईकांमध्ये वाद झाल्याने यात दोघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील इसामु नगरातील वसीम योचा हनीफ व अरबाज अली फिरोज अली यांच्यात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून वाद झाला. यात वसीम हनीफ यांना बाबू फिरोज अली याने पकडून ठेवले तर अरबाज अली फिरोज अली याने काठी डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच सुलतान अली फिरोज अली व अमीन फिरोज अली यांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत वसीम हनीफ यांच्या परिवारास शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत वसील हनीफ यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.संजय मालसुरे करीत आहेत.
तर अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वसीम शेख हनीफ याने अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांच्या पत्नीस शिवीगाळ का केली अशी विचारणा केली. याचा राग आल्याने अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांना वसीम शेक हनीफ, वसीमची आई मुन्नी हनीफ शेख, वसीम याची मोठी बहिण, वसीम याचा जिजाजी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच वसीम शेख हनीप याने काठीने पायावर, खांद्यावर मारहाण केली. याबाबत अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. संजय मालुसरे करीत आहेत.