अक्कलकुवा ! प्रतिनिधी
कायदा महिलांचे संरक्षण करतो. त्यामुळे महिलांसाठी कोणते कायदे आहेत. त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जर कोणी त्रास दिला, तर त्याला पाहिल्या वेळस विरोध करा. नाही तर अपराधी मानसिकता पुन्हा पुन्हा त्रास देण्यासाठी प्रयत्न करते. असे मत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी साईनाथ सारंग यांनी व्यक्त केले. मंगळवार 29 जून रोजी अक्कलकुवा येथील महिला समुपदेशन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी न. भ. सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे , आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक शिंगटे यांनी सांगितले की महिला मानत कोणतीही शंका बाळगता अन्याय विरोधात आवाज उठवला पाहिजे. पोलिस विभाग आपल्या पाठीशी उभे आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक राहुल जगताप, अक्कलकुवा तालुका समन्वयक सुमित्रा वसावे, जमीला पाडवी, ज्योती वसावे आदींची परिश्रम घेतले.