Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेती साहित्य चोरी करणाऱ्या तिघांना अटक,पाच लाखाचे साहित्य जप्त

team by team
April 27, 2023
in क्राईम
0
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात शेतकरी बांधवांचे शेती साहित्य चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते. घडलेल्या घटना कष्टकरी शेतकरी बांधवाच्या भावनांशी निगडीत होत्या व चोरी झालेल्या शेती साहित्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून  पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात झालेल्या शेती साहित्य चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त व वेळ यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते. दि.24 एप्रिल 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मागील काही दिवसांमध्ये शेताती शेती साहित्य चोरीचे गुन्हे हे तळोदा तालुक्यातील आमलाड गावात राहणारे हरीष गोसावी, अरुण गोसावी व भरत पाडवी यांनी मिळून केली असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा तालुक्यातील आमलाड गावात जावून माहिती काढली असता ते तळोदा येथे गेल्याचे समजून आल्याने पथकाने तळोदा येथे येवून त्यांचा शोध घेतला असता तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात तीन इसम संशयास्पद स्थितीत फिरतांना मिळून आले म्हणून त्यांच्यावर संशय आल्याने  हरीष कांतीलाल गोसावी , अरुण हिरालाल गोसावी , भरत शांतीलाल पाडवी  सर्व रा. आमलाड ता. तळोदा यांना अटक केली.ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयीत इसमांना शेती साहित्य चोरीच्या गुन्ह्यांबाबत विचारले असता ते उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले. म्हणून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये तळोदा तालुक्यातील आमलाड, तळवे, मोड, चिनोदा व नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथील शेतातून रात्रीच्यावेळी ठिबक नळी व लोखंडी नागर चोरी केलेबाबत सविस्तर हकिगत सांगितली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतांना चोरी केलेले ठिबक नळी व लोखंडी नागर बाबत विचारले असता त्यांनी चोरी केलेले ठिबक नळी व लोखंडी नागर हे हरीष गोसावी याचे आमलाड येथील घराच्या पाठीमागे झाकून ठेवलेले असलेबाबत सांगितल्याने 66 हजार रुपये किमतीचे ठिबक नळ्या व 2 लाख 25 हजार रुपये चार लोखंडी नागर व 1 लक्ष 70 हजार रुपये किमतीचे गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेले 2 वाहन असा एकुण 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाबाबत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी करुन पाहिले असता नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे,तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील सांगितले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक विशाल नागरे, बापु बागुल, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वनविभागाच्या पथकाने 1525 हेक्टर वरील अतिक्रमण नष्ट करीत वनजमीन घेतली ताब्यात

Next Post

प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

Next Post
प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम" या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add