धडगाव l प्रतिनिधी
येथील महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य व विष्णु कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व वनस्पतीशास्र विभागप्रमुख तथा मुख्य लेखक प्रा. डाॅ. एच. एम. पाटील व अन्य तीन सहलेखकांनी लिहिलेल्या “प्लाॅन्ट फिजिऑलाॅजी ॲंड मेटाबाॅलिजम” या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मध्यप्रदेशातील एम. पी. भोज विद्यापीठ, भोपाळचे माजी कुलगुरू प्रा. डाॅ. जयंत सोनवलकर यांच्या हस्ते नुकतेच इंदूर येथे करण्यात आले.
हा ग्रंथ युजीसीच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. यासाठी भारतभर विविध शहरात तसेच ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा ग्रंथ भारतातील वनस्पतीशास्र अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असे याप्रसंगी प्रतिपादन कुलगुरू प्रा. जयंत सोनवलकर यांनी केले.
प्रा. डाॅ. पाटील यांची अजून दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. याप्रसंगी जायंटस फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड. संगीता पाटील, सेंट पाॅल मॅनेजमेंट इन्स्टिट्युट, इंदूरचे प्रा.डाॅ.अजय पाटील हेदेखील उपस्थित होते.