नंदुरबार l प्रतिनिधी

श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची आज महाआरती व महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली.

दि. 12 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत नंदुरबार येथील नेहरू चौकातील स्वामी समर्थ केंद्र व प्रशिक्षण प्रकल्प येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताह कालावधीत सामूहिकरीत्या सेवा करण्यात आली .यात गणेश याग, मनोबोध याग, रुद्र याग, गीताई याग,चंडी याग, स्वामी याग यासह प्रहर व विविध सेवा करण्यात आली .या सप्ताह कालावधीत 374 सेवेकरांनी गुरुचरित्र पारायण वाचून आपली सेवा रुजू केली.
यासह दुर्गा सप्तशती पाठ 423, स्वामी चरित्र सारामृत पाठ 479 ,रुद्र पाठ 343 ,मल्हारी महात्म पाठ 406, यासह श्री स्वामी समर्थ मंत्र जप 52 लाख 4 हजार 844,श्री नवार्णव मंत्र 5 लाख 98 हजार 752,श्री गायत्री मंत्र 5 लाख 81 हजार 688,महामृत्यूजय मंत्र,2 लाख 70 हजार 756 एवढी सेवा या फक्त कालावधीत करण्यात आली. आज सप्ताहाची महाआरती व प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..









