नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्र.४ या गावाजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. तर तिघांना दुखापत झाली असून याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील चांदसैली येथील काकड्या इरमा वळवी व त्यांचा मुलगा सुहास काकड्या वळवी (वय १९) दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एजी १२३७) जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ डी ८७५८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून रोझवा पुनर्वसन क्र.४ गावाजवळ काकड्या वळवी यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला.
अपघातात सुहास वळवी या तरुणाचा मृत्यू झाला. तर काकड्या वळवी, दुचाकी चालक व त्याच्या मागे बसलेला मुलगा अशा तिघांना दुखापत झाली. दोन्ही वाहनंचे नुकसान झाले. याबाबत काकड्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र जाधव करीत आहेत








