नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांची नुकतीच भेट घेतली.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत व तात्काळ उपचार मिळावेत तसेच पुणे, मुंबई,नाशिक सारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आला असून, बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 एप्रिल रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी सिहोर येथे श्री विठ्ठलेश सेवा समितीचे शिव महापुराण कथाकार पं. पंडित मिश्रा यांची भेट घेतली. उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले असून
नंदूरबार येथे 22 एप्रिल रोजी दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांनी एक दिवसासाठी कथा होणार आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असून लाखो भक्त येण्याची शक्यता आहे.